तीन मुलांचे चार दिवस
साधना प्रकाशन
लेखक - आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे.
१५२ पाने
किंमत २०० रुपये.
३ मुलांचे ४ दिवस....
आता आपण या प्रवास वर्णनामध्ये नक्की काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
सफर माणुसकीची - आदर्श पाटील
२२ डिसेंबर २०१६ रोजी विकास,आदर्श आणि श्रीकृष्ण त्यांच्या प्रवासाला सुरवात होते. त्यांच्या प्रवासाचा मार्ग भामरागड - बेंद्रे - बिजापूर - बसगुडा - चिंतलवार - दोरानापल - सुकमा - दंतेवाडा - मालकानगिरी - बालिमेला डॅम - विशाखापट्टणम असा होता. म्हणजेच ते महाराष्ट्र - छत्तीसगड - ओडिशा आणि तेलंगणा अश्या ४ राज्यांमधून प्रवास करणार होते. आणि हा संपूर्ण प्रवास ते सायकलने करणार होते. त्यासाठीही खूप कारणे होती. या आधीही त्यांनी गडचिरोलीला एक दौरा केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याची एक थिम निवडली होते ति अशी कि - ' माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी '.
या प्रवासादरम्यान त्यांनी प्रकाश आमटेंची भेट घेतली होती. तसेच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणांचीही माहिती आपल्याला यातून समजते. तिघांनीही खूप छोट्या छोट्या गोष्टींचे खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण केले आहे हे पुस्तक वाचताना लक्षात येईल.
भारताला जवळ जवळ स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊन गेली आहेत तरीही जो दुर्गम भाग आहे तिथे अजूनही ज्या मूलभूत गोष्टी (वीज, शिक्षण,रस्ते ,आरोग्य सुविधा )पोहोचल्या नाहीत हि एक शोकांतिका असल्याचे आपणास या पुस्तकातून अनुभवायला मिळतात.जे ४ दिवस नक्षलवाद्यांसोबत राहिले त्याचेही सखोल वर्णन आपल्याला यामध्ये वाचायला मिळेल. त्यामध्ये या तिघांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या सर्व समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या काय असेल असं जर मला विचारले तर मी म्हणेन भाषा . कारण जर आपण पुढच्या व्यक्तीसोबत जर समजेल असे संभाषण नाही करू शकलो नाही तर समस्या अजून वाढतात.आणि हे समस्या सोडवण्यासाठी तेथील एका मुलाची हुंगा नावाच्या मुलाची त्यांना खूप मदत झाली. तसेच छोट्या छोट्या गोष्टींकडे किती जाणीवपूर्वक द्यावे लागले. आणि मह्त्वाचे म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा ज्याच्यामुळे ते आज जिवंत आहेत त्याचे वर्णन वाचनीय आहे.
ते ४ दिवस ज्यावेळी त्यांचा घरच्यांसोबत कसलाच संपर्क झाला नव्हता. आणि आपण असे किती दिवस इथे राहणार आहोत याचीही त्यांना कल्पना नव्हती. त्यातील काही क्षण खूपच अंगावर शहारे आणण्यासारखे आहेत ते अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायलाच हवे.
या पुस्तकात आपल्याला निसर्गाचे वर्णन हि खूप छान वाचायला मिळते.
प्रवास : समृद्ध करणारा - विकास वाळके
विकासला तसे लहानपणा पासूनच सायकल चे वेड होते. जवळ जवळ १००० किलोमीटर चा प्रवास सायकल ने करायचा असा बेत होता या सर्वांचा. गरजेपूर्ते सामान घेऊन आपापल्या सायकल्स घेऊन निघाले. त्यांना माहित नव्हते कि त्याच्या या प्रवासात त्यांना कोण कोणते अनुभव येणार आहेत. खूप खडतर वाटेतून वाट काढत , नवीन नवीन माणसे जोडत ,तसेच आपला त्रास इतराना होणार नाही याची काळजी घेत यांचा प्रवास सुरु झाला. या प्रवासादरम्यान आदिवासी संस्कृतीबद्दल जवळून माहिती घेता आली तसेच त्यांच्या प्रथा, परंपरा कशा असतात याही जवळून अनुभवता आल्या. २७ डिसेम्बर च्या दिवशी बासगुडा गावाजवळ पोहोचले. गावाच्या जवळपास CRPF चा कॅम्प होता. पुढे जाण्यासाठी कॅम्प मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळवणे गरजेचे असल्याने त्यांनी कॅम्प मध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला भेटले.
तसेच यावेळी इतर काही लोकांनी त्यांना पुढे न जाण्याचाही सल्ला दिला पण यांचा निश्चय पक्का होता आता काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. असे यांनी ठरवलेच होते. त्यातील एका व्यक्तीने तर विनवनीच करायला सुरुवात केली तो असाही म्हणाला , ‘जीव प्यारा असेल तर पुढे जाऊ नका,तुमच्या पाया पडतो तुम्ही मागे जा पुढे नका जाऊ.’ यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते कि ज्या दुर्गम भागात ते निघाले आहेत तो भाग किती भयानक असेल याची कल्पना येते. पण पुढे जाण्याच्या विचारावर ठाम असल्याने त्यांनी कुणाचेच काही ऐकले नाही. यांचा हेतू साफ होता आणि यांचा स्वतःवर जो विश्वास होता त्याची आपल्यला दाद घेतली पाहिजे.
पुढे गेल्यानंतर त्यांना काही लोकांनी अडवून त्यांची चौकशी करायला सुरुवात केली तसेच त्याच्या बॅग्स तपासायला सुरुवात केली . याना काहीच कळेनासे झाले त्यांनी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव न आणता ते सांगतील तस करायला सुरुवात केली. खरं तर यांना अंदाज आला होता कि काय चालू आहे याचा. तसेच त्यांच्याकडे जो त्यांच्या प्रवासाचा नकाशा होता त्यावरून त्या लोकांना शंका अली कि हे लोक पोलिसाचे हेर वगैरे आहेत. पुढचे चार दिवस वेगवेगळे लोक येऊन उलट सुलट तपासणी करायचे.घरच्यानशी कसलाच संपर्क झालेला नव्हता घरचे काळजीत असतील याच जास्त टेन्शन येत होत. हे लोक कधी इथून सोडणार हेही समजत नव्हते. त्यांच्याशी नम्रपणे वागणे अन माणुसकीवर विश्वास ठेवणे एवढ्याच गोष्टी त्यांच्या हातात होत्या. त्यांची भाषा वेगळी असल्याने आम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट बोलता येत नव्हते. हुंगा नावाचा एक मुलगा होता त्याला थोडीफार हिंदी येत होती त्यामुळे आंधी त्याच्याच माध्यमातून संभाषण करायचो. या चार दिवसांचे वर्णन वाचण्यासारखे आहे. त्यांच्या मनामध्ये हजार प्रश्न येत होते ,काय करतील हे लोक,मारतील का असे बरेच प्रश्न. एकमेकांना आधार देण्याशिवाय आणि संयम ठेवणे एवढेच त्यांच्या हातात होते.
यामध्ये त्या तिघांचे समन्वय खूप चांगले होते. त्यामुळे ते तिथून जिवंत परत येऊ शकले. जोपर्यंत नक्षलवाद्यांची खात्री पटली नाही
तोपर्यंत त्यांना तिथून सोडले नाही. ज्यावेळी त्यांची खात्री पटली कि यांचा उद्देश आपल्याला हानी पोहोचवणे हा नाही त्यावेळी त्यांनी यांना सुखरूप सोडले. यावरून आपल्या असे लक्षात येते कि,नक्षलवादी म्हणजे आहेत तरी कोण?तीपण माणसेच आहेत. आपण जर त्यांना त्रास नाही दिला तर तेही आपल्याला हानी नाही पोहोचवणार.
अनुभूती : दुहेरी संघर्षाची - श्रीकृष्ण शेवाळे
आपण पकडले गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर श्रीकृष्ण ने देवाकडे प्रार्थना केली. त्याचा त्याच्या कार्यावर विश्वास होता. आपण चांगले काम केले तर जे होईल ते चांगल्यासाठीच होईल यावर त्याचा विश्वास होता. यांच्याकडे जो नकाशा होता तो कसाकाय आला. त्यामुळे खूपच त्यांच्या मनात शंका यायला लागली. तो नकाशा कडून घेऊन त्यांनी सांगितले कि तुम्हाला इथे २ दिवस राहावे लागेल. जे दादा लोक आहेत त्यांनी परवानगी दिली कि मग आम्ही तुम्हाला इथून सोडू. २ दिवस म्हणता म्हणता ४ दिवस त्यांना थांबावे लागले तिथे. त्यांनी त्यांची पूर्ण चौकशी केली त्यांचा हेतू जाणून घेतला आणि नंतर त्यांना सोडले. या ४ दिवसात त्यांना काय काय अनुभव आले ते डिटेल मध्ये तुम्ही बुक मध्ये वाचू शकता. नक्षलवादी हेही माणसेच आहेत. त्यांच्याकडे आपण माणूस म्हणून बघणे गरजेचे आहेत ते आपले शत्रू नाहीत. या पुस्तकातून आपल्याला असे समजते जर त्याचे हक्क त्यांना मिळाले तर ते हिंसक मार्गांचा वापर करणार नाहीत हे लक्षात येते.
३ मुलांचे ४ दिवस या पुस्तकातून तरुणांना शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यामध्ये तरुण म्हणून आपण समाजाचे देणे लागतो,आपण समाजातील घटकांसाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. समाजातील लोकांच्या काय समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. विकास,श्रीकृष्ण आणि आदर्श यांनी त्यांचा सुट्टीचा वेळ इतर तरुणांप्रमाणे न घालवता त्यांनी आदिवासी लोकांच्या सानिध्यात घालवला. ते कसे राहतात,त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना आदिवासी लोकांच्या जवळ जाऊन त्याच्यात मिसळून राहण्याचा प्रयत्न केला. सामाजिक प्रश्न काय आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजेत व त्यांना भिडन्याचं साहस तरुणांनी स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. तरुणांनी आपले कर्तव्य काय आहेत आणि आपण ती कशी पार पाडू यावर विचार करणे गरजेचे आहे.जसे या पुस्तकामध्ये त्या तिघांना काही प्रश्न होते त्याची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांनी केलेले साहस याचे कौतुक करण्यासारखे आहे
३ मुलाचे ४ दिवस हे पुस्तक Amezon आणि Flipkart वर उपलब्ध आहे.
- माधुरी वेताळ
.jpeg)
खुप छान, माधुरी! पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. लिहीत रहा.
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice sirji
ReplyDelete